Chikkodi

मासेमारीसाठी कृष्णा तीरावर युवकांची गर्दी : YOUTHS RUSHES TO KRISHNA RIVER FOR FISHING

Share

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठावर मासे पकडण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे.

होय, गेल्या काही दिवसांत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे हातात मासेमारीसाठी गळ घेऊन नदीवर जाणाऱ्या तरुणांचे दृश्य सर्रास पाहायला मिळत आहे. चिक्कोडी, रायबाग तालुक्‍यातील यड्राव, नसलापूर, दिग्गेवाडी आदी नदीकाठच्या गावातील तरुणही मासे पकडण्यासाठी गावात येत आहेत. अर्धा, एक, दोन, तीन किलो वजनापर्यंतचे मासे त्यांना मिळत आहेत. मासेमारी हा काहींचा छंद तर काहींचा व्यवसाय आहे. पोटासाठी काहीजण हा पारंपरिक व्यवसाय करतात.

चिक्कोडी-रायबागमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

 

Tags: