गोवामार्गे गायींची कत्तलीसाठी अवैध तस्करी केली जात असून त्यावर कारवाई करून बंदी घालण्याची मागणी खानापूर भाजपने गोवा सरकारकडे केली आहे. यासंदर्भात भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याना निवेदन दिले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी खानापूरच्या भाजप नेत्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. गोव्यात होणारी गायींची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मद्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान गोव्यात कत्तलीसाठी गायी आणण्यात येतात.
त्यामुळे या वेळेत गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करून गायींच्या तस्करीवर नियंत्रण आण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यात गोशाळा उभारण्यात येईल असे सांगितले. यावेळी अभिजित चांदीलकर, किरण तुडयेकर, ज्ञानेश्वर दौलतकर, अमीर दोडमनी आदी उपस्थित होते.


Recent Comments