समाजमाध्यमांवर नुपूर शर्मांचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू टेलर कन्हैयालाल याची हत्या केल्याच्या निषेधार्थ बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आज रास्ता रोको करून जोरदार निदर्शने केली.

होय, मोहम्मद पैगंबरांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेल्या उदयपूर येथील हिंदू टेलर कन्हैयालाल यांची धर्मांधांनी नुकतीच तलवारीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटत आहेत. बेळगावातही आज गुरुवारी सकाळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी चन्नम्मा चौकात भय आंदोलन केले. जय श्रीराम अशा जोरदार घोषणा देत रास्ता रोको करून धर्मांधांच्या प्रतिकृतीचे दहन करून हिंदू कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कन्हैयालाल यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी निदर्शकांनी केली.
यावेळी निदर्शकांना संबोधित करताना विश्व हिंदू परिषदेचे नेते कृष्णा भट म्हणाले, देशात खरे बोलणाऱ्यांच्या हत्या करण्याचा डाव धर्मांध शक्तींनी आखल्याचे कन्हैयालाल यांच्या हत्येवरून स्पष्ट होते. पैगंबर, मुस्लिम धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांचे मुडदे पाडू म्हटल्यावर कोणीही हे सहन करणार नाही. घटनात्मक पद्धतीने निषेध नोंदविण्याचा कायद्यात परवानगी आहे. कर्नाटकात धर्मांधांनी 24 निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. गेल्या 70 वर्षांत काँग्रेसने मुस्लिमांचे तुष्टीकरण केल्याचे दुष्परिणाम आज आम्ही भोगत आहोत असे भट यांनी सांगितले. बेळगावच्या खा. मंगल अंगडी, बेळगाव ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव, उज्वला बडवाण्णाचे, डॉ. सोनाली सरनोबत, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, श्रीराम सेनेचे नेते रवी कोकितकर यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते.
दरम्यान, निदर्शन, आंदोलनावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौक परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आंदोलनस्थळी नजर ठेवण्यात आली होती. 200 हुन अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडून आंदोलन केल्याने चन्नम्मा चौकात काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
Recent Comments