अथणी तालुक्यातील आणि कागवाड मतदार संघातील ग्रामपंचायतींना मंजूर झालेल्या कचरा संकलन वाहनांचे आ. श्रीमंत पाटील यांच्याहस्ते पूजा करून उदघाटन करण्यात आले. चालकांना गाडीच्या चाव्या देऊन त्यांनी वाहनांना चालना दिली.

अथणी तालुक्यातील गुंडेवाडी गावातील काडसिद्धेश्वर देवस्थानाला भेट देऊन आ. श्रीमंत पाटील यांनी या वाहनांना चालना दिली.
त्यानंतर बोलताना आ. श्रीमंत पाटील म्हणाले, गावचा विकास व्हायचा असेल तर तेथे स्वच्छता असणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली आहे, तसेच विजापूर सिद्धेश्वर स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे जाईन तेथे स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन स्वच्छतेकडे सर्वानी लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना तालुका पंचायतीचे मुख्याधिकारी शेखर करीबसपनगोळ म्हणाले, कागवाड भागातील गावांसाठी स्वछता विषयक स्पर्धा घेण्यात येणार आहे. जो गाव सर्वाधिक स्वच्छ असेल त्याला १ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे, दुसऱ्या क्रमांकाच्या गावाला ५० हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकाच्या गावाला २५ हजार रुपयाने बक्षीस देण्यात येणार आहे. बाईट
यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकारी प्रवीण पाटील, तापं व्यवस्थापक उदयगौडा पाटील, पीडीओ काडेश आडहळ्ळी , ग्रापं अध्यक्षा संक्रवा जागवानकर, उपाध्यक्ष गुरुशांत गेज्जी, शिवानंद गोलभावी, आबा चव्हाण, कुमार पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments