हुक्केरी सरकारी इस्पितळाला दिवाणी न्या. के. एस. रोट्टेर आणि न्या. के. अंबण्णा यांनी आज सकाळी अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. इस्पितळातील रुग्णांशी संवाद साधून त्यांनी माहिती घेतली.

न्या. के. एस. रोट्टेर आणि न्या. के. अंबण्णा यांनी आज सकाळी अचानक हुक्केरी सरकारी इस्पितळाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्ण तपासणी विभाग, रक्तपेढी, रक्त तपासणी प्रयोगशाळा, औषध वितरण विभाग, प्रसूती विभाग आदींची पाहणी केली. मुख्य वैद्याधिकारी डॉ. महांतेश नरसन्नवर आणि डॉ. रियाज मकानदार यांनी त्यांना सर्व विभागांची माहिती दिली.
इस्पितळातील औषध विभागातील गलथान व्यवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करून एका आठवड्याच्या आत सर्व व्यवस्था सुरळीत करण्याची सूचना दिली.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना न्या. के. एस. रोट्टेर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हुक्केरी सरकारी इस्पितळाला अचानक भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली आहे. रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या उपचारांबाबत माहिती घेतली आहे. येथील डॉक्टर चांगले काम करत आहेत. काही किरकोळ त्रुटी दिसून आल्या असून त्या दूर करण्यास सांगितले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी इस्पितळाचे कर्मचारी उदयसिंग हजारे, आर. हरीश, सतीश चौगला आणि वकील उपस्थित होते.


Recent Comments