Chikkodi

अग्निपथ योजना रद्द करा : चंद्रकांत हुक्केरी

Share

युवकांना देशसेवेची तसेच नोकरीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या सैन्यभरतीची प्रक्रिया कंत्राटी तत्वापर्यंत खालच्या स्तराला आणण्याचे केंद्र सरकारचे धोरण निषेधार्ह आहे. ते सोडून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हुक्केरी यांनी केली.  

चिक्कोडी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हुक्केरी म्हणाले, अग्निपथच्या माध्यमातून अग्निवीरांची अग्निपरीक्षा घेण्याची योजना सरकारने तत्काळ मागे घ्यावी. त्याचप्रमाणे पूर्वीप्रमाणेच नियमित सैन्यभरतीची प्रक्रिया सुरु करावी.

सरकारने सैन्यभरतीसाठी इच्छुक युवकांच्या भावना समजून घ्याव्यात. देशरक्षणाचे सैनिकांचे कार्य खूप जबाबदारीचे आहे. त्यामुळे सैनिक आणि माजी सैनिकांना सवलती वाढवून द्याव्यात. सध्या सैनिकांना मिळणारी वेतन सुरक्षा अग्निपथच्या माध्यमातून काढून घेण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे सैनिकांवर अन्याय होणार आहे. सेवा सुरक्षा न देता या युवकांना रस्त्यावर आणण्याचे काम सरकार करत आहे हे निषेधार्ह आहे. त्यामुळे ही योजना तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणेच सैन्यभरती प्रक्रिया आणि नियम कायम ठेवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हुक्केरी यांनी केली.

 

 

Tags: