Chikkodi

जुने दिग्गेवाडीत रात्री वीज गुल; ग्रामस्थ हवालदिल

Share

जुने दिग्गेवाडीत रात्रीच्या वेळी वीज गुल होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

होय, ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी सरकार अनेक योजना आणते. परंतु जुने दिग्गेवाडी हे एक असे गाव आहे जे सध्या रात्रीच्यावेळी वीज पुरवठा ठप्प होत असल्याने अंधारात जाते. हेस्कॉमच्या चिक्कोडी उपविभागाच्या हद्दीत येणाऱ्या रायबाग तालुक्यातील जुने दिग्गेवाडीतील कमते मळ्यातील रहिवाशी भागात निरंतर ज्योती योजनेतून वीज पुरवठा देण्यात आलेला नाही. त्यामुळे विजेअभावी रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा कागत आहे. गेल्या २ वर्षांपासून रहिवाशांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. २ वर्षांपूर्वी येथे वीज पुरवठा करण्यासाठी विजेचे खांब उभारण्यात आले होते. परंतु उंपावसामुळे ते जमीनदोस्त होत आहेत. येथे सायंकाळी ६ वाजेपर्यंतच वीज पुरवठा सुरु असतो. त्यानंतर संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे.

सायंकाळनंतर वीज गायब होत असल्याने मुलांना अभ्यास करताना अडचण येत आहे. मळ्यातील वस्ती आणि नदीकिनाऱ्याचा भाग असल्याने येथे रात्रीच्यावेळी साप-विंचवांचा ढोक अधिक असतो. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊनच जगावे लागत आहे. याबाबत ग्राम पंचायतीला वारंवार कळवून देखील काहीच उपयोग झालेला नाही. अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर ते येतात, पाहणी करतात अन निघून जातात. पुढे काहीच कार्यवाही करत नाहीत असा संताप ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांविरोधात व्यक्त केला.

एकंदर जुनी दिग्गेवाडी गावातील कमते वस्तीतील रहिवाशांना सायंकाळनंतर विजेअभावी अंधारात जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे २४ तास वीज पुरवठ्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. हेस्कॉम त्याची दखल घेऊन मागणी पूर्ण करणार का हे पाहिले पाहिजे.

Tags: