विजेच्या धक्क्याने मरण पावलेल्या हेस्कॉम लाईनमनच्या वारसांना आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी ५ लाख रुपये भरपाई रकमेचा धनादेश प्रदान केला.

होय, खानापूर तालुक्यातील कग्गनगी येथे शॉर्ट सर्किटमुळे विजेचा धक्का लागून हेस्कॉमच्या मालन्नावर नामक लाईनमनचा मृत्यू झाला होता. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी पाठपुरावा करून त्यांच्या वारसांना सरकारकडून ५ लाख रुपये भरपाई मंजूर केली आहे. त्या रकमेचा धनादेश आ. निंबाळकर यांनी मालन्नावर यांच्या पत्नी सुमित्रा याना प्रदान केला. 
यावेळी बोलताना आ. निंबाळकर म्हणाल्या, मालन्नावर यांच्या निधनानंतर सरकारकडून ५ लाख रुपये भरपाई निधी मंजूर करून आणला आहे. त्याशिवाय मालन्नावर यांच्या मुलाला हेस्कॉममध्ये नोकरीवर घेण्यात आले आहे. गेलेला जीव तर परत आणता येत नाही. पण मालन्नावर कुटुंबासोबत मी उभी आहे असे सांगून धीर दिला.
यावेळी हेस्कॉमचे अधिकारी आणि मालन्नावर कुटुंबीय उपस्थित होते.


Recent Comments