Raibag

नसलापुरात श्री रेणुका देवी मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण

Share

रायबाग तालुक्यातील नसलापूर गावात श्री रेणुका देवी मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा भक्तिभावाने पार पडला. यावेळी शेकडो भाविकांनी देवीचा जयघोष करत उदकार घातला.

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नसलापूर गावात हा उत्सव भरला. श्री रेणुका देवी मूर्तीची  प्रतिष्ठापना आणि कळसारोहण हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. सुवासिनी जलकुंभ डोईवर घेऊन देवीच्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.

यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी देवी दर्शन घेतले. देवीला विविध फुलांनी आणि दागिन्यांनी सजवण्यात आले होते. देवीच्या दर्शनासाठी सुवासिनी, ग्रामस्थ व आजूबाजूच्या गावचे भाविक मंदिरात आले होते. त्यांनी भक्तिभावाने दर्शन घेऊन देवीला नैवेद्य अर्पण केला. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवीचे महात्म्य सांगितले. बाईट  श्री रेणुकादेवी मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी यड्राव आणि ब्याकुड चौंडकी पथकाकडून हरिभजन कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी मूर्ती प्रतिष्ठापना समितीचे संभाजी कृष्णा निर्मळे हरिपंथ महाराज, सरजाबाई महादेव रायमाने, महादेव रायमाने, परशुराम वंजिरे, यल्लाप्पा होनकांबळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

 

 

Tags: