Chikkodi

शांतिगिरी येथे भव्य उत्साहात महामस्तकाभिषेक

Share

श्री क्षेत्र शांतिगिरी येथे आचार्य देशभूषण यांचे जन्मठिकाण तसेच समाधी स्थळ आहे. आपल्या जीवनकाळात जैन धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी कार्य केले आहे, अशी प्रतिक्रिया नांदणी मठाचे स्वस्ति श्री जिनसेन भटचारक स्वामी यांनी व्यक्त केली.

चिकोडी तालुक्यातील कोथळी – कुप्पनवाडी श्री क्षेत्र शांतिगिरी येथे आचार्य देशभूषण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महामस्तकाभिषेक कार्यक्रमात ते बोलत होते. देशभूषण महाराजांनी कोथळीपासून कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्लीपर्यंत जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला असल्याचे ते म्हणाले.

यानंतर आमदार गणेश हुक्केरी बोलताना म्हणाले, श्रीक्षेत्र शांतिगिरी येथे आपण आपले वडील प्रकाश हुक्केरी यांच्यासमवेत विकासकामे राबविली आहेत. आगामी काळात देखील या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर चिंचली येथील अल्लमप्रभू स्वामीजींनी देशभूषण महाराजांविषयी माहिती दिली. तसेच श्रीक्षेत्र शांतिगिरी येथे झालेल्या अनेक विकासकामांसंदर्भात आनंद व्यक्त केला.

ट्रस्टचे अध्यक्ष पी आर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येथील विकासकामांची माहिती दिली. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाद्वारासाठी देणगी दिलेल्या जयकुमार खोत यांचा सत्कार करण्यात आला. ज्योतिप्रसाद जिल्ले, समाधिभूषण महाराज, नितीन शांतीलाल गांधी, अशोक जैन, मुनिश्री समाधिभूषणजी महाराज, आर्यिका निश्रहमती माताजी, आमदार कल्लाप्पाण्णा मगेन्नावर, डॉ. पदमराज पाटील, जयकुमार उपाध्ये, पासगौड पाटील, किरण पाटील, तात्यासाहेब पाटील, पायगौड खोत आदी उपस्थित होते.

महामस्तकाभिषेक कार्यक्रमात देखील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी ३ तीर्थांकर मूर्तींना महामस्तकाभिषेक घालण्यात आला.

Tags: