Hukkeri

Meeting of PDOs in Hukkeri taluka: हुक्केरी तालुक्यातील पीडीओंची सभा

Share

हुक्केरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन हुक्केरी तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ यांनी केले.

हुक्केरी तालुका पंचायत सभागृहात आज तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या विकास अधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ यांनी शासकीय अनुदान व त्यांच्या वापराबाबत पीडीओसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश सिदनाळ म्हणाले, तालुक्यातील विविध गावातील लोकांची वीज जोडणी व वीजबिलाबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या सोडवली आहे. पुढील काळात लोकांच्या समस्यांची तातडीने दखल घेऊन त्या सोडविण्याची सूचना करण्यात आली आहे.

यावेळी तालुका पंचायत व्यवस्थापक आर. ए. चटनी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, पीडीओ, सचिव उपस्थित होते.

 

Tags: