Khanapur

वादग्रस्त धार्मिक पोस्ट घालणाऱ्यांची माहिती द्या : नंदगड सीपीआय माळगोंड

Share

विनाकारण व्हाट्स अप ग्रुपवर वादग्रस्त धार्मिक पोस्ट टाकणाऱ्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन नंदगड सीपीआय सतीश माळगोंड यांनी केले आहे.

नंदगड येथे शुक्रवारी सर्व जाती-धर्मांत सौहार्द राखण्याच्या दृष्टीने युवा समितीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी युवकांना संबोधित करताना सीपीआय सतीश माळगोंड यांनी हे आवाहन केले.

नंदगड परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या हेतून सहकारी व्हावे यासाठी युवा समितीची स्थापना केल्याचे सांगून कुठल्याही जाती-धर्माविरुद्ध तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर कोणीही घालू नये. तसे करून शांततेला गालबोट लावू नये यासाठी अशा पोस्ट घालणाऱ्यांची माहिती पोलीस खात्याला द्यावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी नंदगडसह परिसरातील गावचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Tags: