: चिकोडी तालुक्यातील कोथळी कुप्पनवाडी येथील श्री क्षेत्र शांतिगिरी येथे ३१ मे रोजी ३५ वा महाभिषेक तसेच आचार्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने भक्तांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक किरण पाटील यांनी केले आहे.

चिकोडी तालुक्यातील कोथळी – कुप्पनवाडी गावातील शांतिगिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ३१ मे रोजी पहाटे ५ वाजता मंगल निनाद, सकाळी ६ वाजता ध्वजारोहण, सकाळी ८ ते ९ पर्यंत पंचामृत अभिषेक, महाशांतीधारा जिनवाणी आणि आश्चर्याद्वायीधर प्रतिमेची भव्य शोभायात्रा असे एकंदर कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
सकाळी ९ ते १० पर्यंत आचार्यांचा पादुकाभिषेक, ११ ते १ पर्यंत श्री शांतीनाथ विधान, दुपारी २ ते ४ पर्यंत आदरांजली सभा, सायंकाळी ४ ते ६ पर्यंत मस्तकाभिषेक होणार आहे. प. पु. १०८ मुनिश्री समाधी भूषणजी महाराज, प. पु. १०५ आर्यिका श्री निसपृहमती माताजी, नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भटवारक महास्वामी, चिंचणी येथील श्री अल्लमप्रभू स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, आमदार गणेश हुक्केरी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी खासदार वीरकुमार पाटील, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, धर्मादाय खात्याच्या शशिकला जोल्ले, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे, आमदार अभय पाटील, संजय पाटील, विनोद दोड्डन्नावर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जैन ट्रस्टचे सचिव पासगौड पाटील यांनीं माहिती देताना सांगितले कि, ट्रस्टचे अध्याल्श वकील पी आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३१ मे रोजी श्री क्षेत्र शांतिगिरी कोथळी कुप्पनवाडी येथे महामस्तकाभिषेक तसेच आचार्यद्वयी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे शांतिगिरी श्री क्षेत्री करण्यात येत असलेल्या विकासकामांची माहिती दिली.
यावेळी शांतिगिरी ट्रस्टचे तात्यासो बाळगौड पाटील, खजिनदार पायगौड खोत आदी उपस्थित होते.


Recent Comments