Nippani

निपाणीत नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

Share

 नोकरी मिळाल्याच्या नैराश्यातून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निपाणीच्या घडली.

निपाणी शहरातील मेस्त्री गल्लीतील ३२ वर्षीय रहिवासी राहुल अशोक चव्हाण असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. राहुलने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले होते. मात्र त्यात त्याला अपयश आले होते.

नोकरीअभावी त्याचे लग्नही ठरत नव्हते. त्यामुळे तो निराश झाला होता. त्यातूनच बुधवारी रात्री त्याने सत्यसाई रस्त्यावरील एका जुन्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निपाणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Tags: