निपाणी तालुक्यातील यमगर्णी येथील राष्ट्रीय महामार्गाशेजारील ढाब्यात झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

गेल्या ६ दिवसांपूर्वी यमगर्णी येथे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारील एका ढाब्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ५ जण जखमी झाले होते. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांचा उपयोग न होता, गंभीर जखमी ढाबा मालक याकूब महमद कडीवाल आणि कामगार अक्रम उल हक यांचा इस्पितळात मृत्यू झाला.
मुस्तफा आलम, मोहंमद आझाद आणि अन्वर मोहंमद या अन्य ३ जखमींवर उपचार सुरु आहेत. निपाणी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.


Recent Comments