नुकत्याच बेंगळूर येथे झालेल्या राज्य पातळीवरील मिनी ऑलिंपिक जलतरण स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात बेळगावच्या स्वरूप सतीश धनुचे याने विविध जलतरण प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि कास्यपदकांची कमाई केली.

स्वरूपने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य तसेच 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात कास्यपदक मिळविले. तो मद्रास इंजीनियरिंग ग्रुप बेंगळूर येथे सराव करत आहे. त्याला सैजू जोसेफ आणि अंकुश कणबरकर यांचे प्रशिक्षण तर कर्नल ईश्वर रेड्डी व सुभेदार प्रदीपकुमार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भुवनेश्वर-ओरिसा येथे जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तो भाग घेणार आहे. खानापूर तालुक्यातील गणेबैल सरकारी दवाखान्यातील लॅब टेक्नीशियन सतीश धनुचे यांचा तो मुलगा होय.


Recent Comments