Chikkodi

संघटनात्मक रणनीती आखून निवडणुकीत विजय मिळवावा

Share

उत्तर प्रदेशासह चार राज्यांच्या निवडणुकीला अनुसरून तसेच संघटनात्मक रणनीती आखून राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे गेल्यास १५० हुन अधिक जागांवर बहुमत मिळविणे शक्य आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप राज्य घटक चे उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.

चिकोडी येथील जयप्रकाश भवन येहे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकारिणी सभेत ते बोलत होते. उत्तर प्रदेशात राज्य घटक अध्यक्षांसह बूथस्तरीय, पेज प्रमुखांनी आपल्या व्याप्तीत कठोर परिश्रम घेऊन कार्य केले. यामुळे भाजप उमेदवारांचा अभूतपूर्व विजय झाला. राज्यात १० महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत पदाधिकारीच नाही तर सर्व कार्यकर्त्यांनीही आपली जबाबदारी ओळखून काम करावे, शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीत बेळगाव विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील आमदार, पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी अधिकाधिक परिश्रम घेऊन उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सवदी यांनी केले.

यावेळी चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले होस्पेट येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी सभेत ठरल्याप्रमाणे पक्षाच्या संघटनेवर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
याचप्रमाणे झोपडपट्टी महामंडळाचे अध्यक्ष महेश कुमठळ्ळी, बेळगाव जिल्हा भाजपचे शक्ती केंद्र आहे. पुढील निवडणुकीत देखील १५ हुन अधिक जागांवर भाजप उमेदवार निवडून येणार हे निश्चित असल्याचे ते म्हणाले.

निवडणुकीत बूथस्तरीय, पेज लीडर यांची भूमिका अधिक महत्वाची आहे, असे मत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शाम्भवी अश्वथपूर यांनी गीत सादर केले. जिल्हा प्रधान सचिव सतीश आप्पाजीगोळ यांनी स्वागत केले. चिकोडी सदलगा मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी आभार मानले. यावेळी विभाग सहसंघटना सचिव जयप्रकाश यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेतकरी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष धुंडाप्पा बेंडवाडे, जिल्हा सह प्रभारी रमेश देशपांडे, जिल्हा प्रधान सचिव निंगाप्पा खोकले, सोशल मीडियाचे प्रसाद पचंडी, शेतकरी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शेखरगौडा मोदगी आदींसह जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.
‌‌

Tags: