संगोळ्ळी गुरुमठचे श्री गुरुलिंग शिवाचार्य स्वामींचा पात्ताधिकार महोत्सव बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी बेळगाव हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींचा सन्मान करण्यात आला. यावेळी बैलहोंगल चे डॉ. महांतेश शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष राजू कोडसम्मानावर यांनी स्वामींचे आशीर्वाद घेतली. यावेळी बोलताना हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी म्हणाले, गुरुलिंग शिवाचार्य स्वामींनी १२ वर्षे मठाचा विकास केला आहे. याचा आपल्याला आनंद आहे. त्यांच्या पट्टाधिक्कार कार्यक्रमाचा आपण भाग आहोत याचा आपल्याला आनंद असल्याचे ते म्हणाले.
सत्कार स्वीकारल्यानंतर संगोळ्ळी श्री गुरुलिंग शिवाचार्य स्वामी म्हणाले, श्री रंभापुरी जगद्गुरू, डॉ. वीर सोमेश्वर यांचा कृपाशिर्वाद आहे यामुळे आपण या मठात मार्गदर्शन करू शकतो. येथील गुरुकुलाची जबाबदारी आपल्यावर आहे. यापुढेही भक्तांचे सहकार्य लाभल्यास अधिक चांगले काम करता येईल, असे शिवाचार्य स्वामी म्हणाले.
यावेळी हुक्केरी श्रींच्या बंधुभावाबद्दल चर्चा करण्यात आली. १२ वर्षे कार्यरत असणाऱ्या श्रींनी यापुढील १०० वर्षेही अशाच पद्धतीने कार्य करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.


Recent Comments