Chikkodi

राजकारणात सध्या प्रवेश नाही: बसवप्रसाद जोल्ले

Share

कर्नाटकाच्या राजकारणात जोल्ले कुटुंबाचे नाव प्रमुख राजकारण्यांमध्ये घेतले जाते. जोल्ले कुटुंबियातील खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि मंत्री शशिकला जोल्ले हे दोन्ही दिग्गज राजकारणी राजकारणात सक्रिय असताना आपण सध्या राजकारणात प्रवेश घेणार नाही, असे स्पष्टीकरण बसवप्रसाद जोल्ले यांनी दिले.

चिकोडी तालुक्यातील एकसंबा परिसरातील बिरेश्वर संस्थेच्या सभाभवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश घेणार का? या प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बसवप्रसाद जोल्ले यांनी हे स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले, आपली आई शशिकला जोल्ले मंत्रीपदी आणि वडील अण्णासाहेब जोल्ले हे खासदारपदी कार्यरत आहेत.

दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. या कारणास्तव सध्या आप्लं राजकारणात प्रवेश घेणार नाही, कोणतीही निवडणूक लढविणार नाही, पुढील काळात संधी मिळाली तर त्यावेळी विचार कारेन, असे बसवप्रसाद जोल्ले यांनी स्पष्ट केले.

शशिकला जोल्ले आणि अण्णासाहेब जोल्ले हे दाम्पत्य कर्नाटकाच्या राजकारणात सक्रिय आहे. यामुळेच त्यांचे सुपुत्र बसवप्रसाद जोल्ले हेदेखील राजकारणात प्रवेश घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र या साऱ्या चर्चांना पूर्णविराम देत सध्या आपण राजकारणात प्रवेश घेणार नसल्याचे बसवप्रसाद जोल्ले यांनी स्पष्ट केले.

Tags: