शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर चिकोडी तालुक्यातील बेन्नीहळ्ळी या गावात बसवण्णा शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एफपीओ योजने अंतर्गत बसवण्णा शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन करण्यात आले असून हि योजना कार्यान्वित करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे प्रतिपादन चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले.
अण्णासाहेब जोल्ले पुढे म्हणाले, देशात आतापर्यंत १० हजार एफपीओचा प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पिकाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी उतापदक कंपन्या मध्यस्थी म्हणून काम पाहतील. शेतकऱ्यांनी या व्यवसायात सक्रिय सहभाग घेऊन स्वावलंबी बनावे, आर्थिक सक्षम व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे जोल्ले म्हणाले. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री शशिकला जोल्ले यांच्याहस्ते करण्यात आले. राज्य शेतकरी मोर्चाचे उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे यांनी प्रास्ताविक तर राजू हरगंणावर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उद्घाटनानंतर बोलताना शशिकला जोल्ले म्हणाल्या, भारत हा कृषिप्रधान देश आहे. परंतु आज शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एफपीओ योजना कार्यान्वित केली आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीपथावर आणण्यासाठी शेतकरी आणि सैनिक यांच्यासाठी लक्ष केंद्रित केल्याचे त्या म्हणाल्या. २०२४ पर्यंत शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पिकाला योग्य भाव मिळवून देण्याचा एफपीओ स्थापन करण्यामागील उद्देश असल्याचे शशिकला जोल्ले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी रायबाग चे आमदार आणि आदिजांबव विकास महामंडळाचे अध्यक्ष दुर्योधन ऐहोळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी एफपीओ हे वरदान आहे. या भागातील शेतकऱ्यांनी बसवण्णा उत्पादक कंपनीचे सदस्यत्व घेऊन आपल्या पिकाला योग्य हमीभाव मिळविण्यासाठी सक्षम व्हावे, असे ऐहोळे म्हणाले. 
हा कार्यक्रम दुरदुन्डेश्वर मठाचे जगद्गुरू पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी आणि क्यारगुड्ड चे अभिनव मंजुनाथ श्री यांच्या दिव्य सानिध्यात पार पडला. या कार्यक्रमास मंत्री उमेश कत्ती, निपाणी नगरपालिका अध्यक्ष जयवंत भाटले, कृषी विभागाचे बेळगाव सह संचालक शिवनगौडा पाटील, चिकोडी कृषी उपसंचालक एल आय रुडगी, सहायक कृषी संचालक मंजुनाथ जनमट्टी, अप्पासाहेब चौगुला, दानप्पा कोटबागी, रुद्राप्पा संगप्पगोळ, अशोक हरगापुरे, भरमाप्पा हुच्चननावर, संजय पाटील, महावीर नाशिपुडी, उपाध्यक्ष संतराम कुंद्रुक, इरगौडा पाटील, विनाक्षी निर्वाणी आदी उपस्थित होते.


Recent Comments