Hukkeri

हिरण्यकेशी नदीची गंगा आरती; उद्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी : चंद्रशेखर स्वामीजी

Share

काशी येथी गंगा आरतीच्या धर्तीवर हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर गंगा आरती करण्यात येणार असल्याची माहिती हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी दिली.

हिरण्यकेशी नदी तीरावर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, बडकुंद्री होळेम्मा देवस्थान शेजारून उत्तराभिमुख वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीची बुधवारी सायंकाळी गंगा आरती करण्यात येणार आहे. गुरुवारी देवस्थानच्या गोपुरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात वेदपटू आणि हजारो महिला सहभागी होणार आहेत असे त्यांनी सांगितले.   

यावेळी होळेम्मा देवस्थानचे मुख्य पुजारी एच. एल. पुजारी आणि देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

Tags: