Khanapur

शिवबसव जयंती मिरवणुकीत आ. निंबाळकर सहभागी

Share

 शिवबसव जयंतीनिमित्त खानापुरातील चिरमुरकर गल्ली मंडळाने काढलेल्या पालखी मिरवणुकीचे . डॉ. अंजली निंबाळकर यांनी पूजन करून उदघाटन केले. खानापुरातील चिरमुरकर गल्ली मंडळाने श्री शिवबसव जयंतीनिमित्त उत्साहात व जल्लोषात पालखी मिरवणूक काढली. आ. अंजली निंबाळकर यांनी ढोल वाजवून निंगापूर गल्लीपर्यंत सहभाग घेतला. निंगापूर गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून नमन केले. त्यानंतर काही काळ सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Tags: