शिव–बसव जयंती आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नंदगड येथे पोलिसांनी संचलन केले.

नंदगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतीश माळगोंड यांच्या नेतृत्वाखाली नंदगड येथे पोलीस संचलन पार पडले. यावर्षी शिवजयंती, बसव जयंती आणि रमजान हे तिन्ही सण एकत्र आले आहेत. ते शांततेत साजरे व्हावेत, कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागू नये या उद्देशाने हा पोलीस रूट मार्च काढण्यात आला.
नंदगड पोलीस ठाण्यापासून सुरु झालेला हा रूट मार्च संगोळ्ळी रायण्णा चौक, बाजारपेठ, हलशी रोड, कॉलेज रोड, कोडे चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक अशा विविध मार्गांवरून काढण्यात आला. समाजकंटकांची गय केली जाणार नाही असा इशाराच या संचलनातून देण्यात आला. नंदगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचे जवान या संचलनात सहभागी झाले होते. फ्लो


Recent Comments