चिकोडी येथे कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून १०० बेड्सची क्षमता असणाऱ्या रुग्णालयाचे काम संथगतीने सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी हे कामकाज संपुष्टात येणे गरजेचे होते मात्र संथगतीने सुरु असलेल्या या कामकाजामुळे रुग्णालय रखडलेल्या परिस्थितीत आहे. हे रुग्णालय जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचा आग्रह जनता करत आहे.

: बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी उपविभागात जनतेच्या सोयीसाठी २० कोटींच्या निधीतून गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी रुग्णालय उभारण्यात येत आहे. २०१६ साली या रुग्णालयाचा कोनशिला समारंभ २०१६ साली पार पाडण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीच या रुग्णालयाचे कामकाज पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे कामकाज रखडलेल्या स्थितीत आहे. चिकोडी उपविभागातील रायबाग, अथणी, हुक्केरी, निपाणी, कागवाड आदी भागातील सुमारे १७ लाख लोकांना या रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. मात्र याठिकाणी सोय होत नसल्याने प्रत्येक रुग्ण बेळगावमधील जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहे. 
राज्य आणि केंद्र सरकार जनतेच्या कल्याणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. अनेक योजना मंजूर करण्यात येत आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अशी अनेक कामे अपूर्ण रहात आहेत. याचाच अनुभव चिकोडी मधील या रुग्णालयाच्या कामकाजावरून येतो. १०० बेड्सची क्षमता असलेल्या या रुग्णालयाचा शुभारंभ करून जनतेसाठी हे रुग्णालय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र सदर रुग्णालयाचे कामकाज राखडल्यामुळे चिकोडी आणि परिसरातील नागरिकांना १२० ते १८० किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातील रुग्णालयात जावे लागते. यासंदर्भात तालुका आरोग्य वैद्याधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
केंद्र सरकारकडून जनतेच्या सोयीसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निदर्शनास येत असून सरकारी कामे लांबणीवर पडली आहेत. परिणामी याचा फटका जनतेला बसत असून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडून आपापल्या कार्यक्षेत्रात जनतेच्या सोयीसाठी कार्यरत राहण्याची आवश्यकता आहे.


Recent Comments