बसवजयंतीचा एक भाग म्हणून चिक्कोडी येथे येत्या ४ मे रोजी मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती राज्य सौहार्द सहकारी महासंघाचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ यांनी सांगितले.

चिक्कोडी येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सौहार्द सहकारी महासंघाचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ म्हणाले, बसवजयंतीचा एक भाग म्हणून श्री शून्य संपादना महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली चिक्कोडी येथे आम्ही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त अयाचार लिंगदीक्षा, बसवण्णा नामकरण सोहळा आणि ४ मे रोजी मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.
यावेळी श्री शून्य संपादना महास्वामीजी म्हणाले, २८ एप्रिल ते ४ मे या काळात शरण जीवन दर्शन प्रवचन कार्यक्रम आणि ४ मे रोजी मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. पत्रकार परिषदेला शेखर चित्तवटगी, सोनू गव्हनाळे, चिदानंद हिरेमठ, राजू होन्नवर, सागर बिसकोप्पा उपस्थित होते.


Recent Comments