Athani

अथणी कसापच्या उपक्रमांना 27 एप्रिलला प्रारंभ

Share

 कन्नड साहित्य परिषदेच्या अथणी तालुका शाखेच्या 2021-22 च्या उपक्रमांचा उद्घाटन सोहळा 27 एप्रिलला अथणीतील आर. एच. कुलकर्णी सभागृहात होणार आहे.

गच्चीनमठाचे शिवबसव स्वामीजी, प्रभुचन्नबसव स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कन्नड साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष नाडोज डॉ.महेश जोशी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी असतील.

रा. स्व. संघाचे उत्तर कर्नाटक राज्याचे सहसंचालक अरविंदराव देशपांडे आणि अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी, बेळगाव कसाप जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड्डा प्रमुख पाहुणे असतील. यावेळी कसाप तालुका पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ होणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कणशेट्टी यांनी दिली.

यावेळी अण्णासाब तेलसांग, विजया अडहळ्ळी, सीए इटनाळमठ, जे. पी. दोडमनी, व्यंकटेश देशपांडे आणि रामण्णा दोड्डनिंगप्पगोळ उपस्थित होते.

 

Tags: