Hukkeri

शिवानंद, गीता मरीगुद्दी यांचा हिरेमठातर्फे सत्कार 

Share

ऑस्ट्रेलियातील सिडनी राज्यातील सिडनी वीरशैव समाजाचे कन्नड संघटनेचे पदाधिकारी शिवानंद दुंडप्पा मरीगुद्दी त्यांच्या धर्मपत्नी गीता शिवानंद मरीगुद्दी यांचा हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी सत्कार केला

यावेळी बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी सांगितले की, शिवानंद मरिगुद्दी हे आमच्या भागातील संकेश्वरचे. सिडनी येथे वीरशैव समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. या कामासाठी देवाने आणखी शक्ती द्यावी.    सत्काराला उत्तर देताना शिवानंद मरिगुद्दी यांनी, सिडनी येथे वीरशैव समाजाचे संघटन मजबूत करण्यामागे हुक्केरी हिरेमठच्या चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांची प्रेरणा असल्याचे सांगितले. यावेळी यावेळी मल्लिकार्जुन दुंडप्पा मरीगुद्दी, सत्य टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक पाटील, एच. एल.  पुजारी, संपतकुमार शास्त्री, शितल ब्याळी, सुरेश जिनराळी, चेन्नप्पा गजबर, सुभाष नाईक आदी मठाचे भक्त उपस्थित होते.

Tags: