हुक्केरी शहरात २६ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. दुंडाप्पा हुगार यांने केले.

हुक्केरी येथे सार्वजनिक रुग्णालयाच्या सभाभवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २६ एप्रिल रोजी सार्वजनिक रुग्णालयात आरोग्य मेळाव्याच्या महत्वपूर्ण योजने अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सांसर्गिक, दीर्घकालीन आणि विशेष आजारांवर वैद्यांकडून तपासणी आणि मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
यावेळी बोलताना तालुका वैद्याधिकारी डॉ. उदय कुडची म्हणाले, २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात विविध आजारांवर मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी हुक्केरीचे आमदार आणि मंत्री उमेश कत्ती, यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांचे सहकार्य लाभले असून विश्वराज फाउंडेशनच्या वतीने अल्पोपहार आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ()
या पत्रकार परिषदेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उदय कुडची, मुख्य वैद्याधिकारी महांतेश नरसन्नवर, , आरोग्य शिक्षणाधिकारी जी.ए. करगुप्पी, महादेवी जकमट्टी, विजयकुमार हत्तरगी आदी उपस्थित होते.


Recent Comments