Athani

दिलेला शब्द पूर्ण करत केली घराची बांधणी अथणी नगरसेवक कल्लेश मड्डी यांनी स्वखर्चातून उभारले घर मड्डी यांच्या कार्याचे लक्ष्मण सवदींनी केले कौतुक

Share

अथणी परिसरातील गरिबीने ग्रासलेल्या कुटुंबाला दिलेल्या शब्दाला जागत अथणी येथील प्रभाग क्रमांक २ चे नगरपालिका सदस्य कल्लेश मड्डी यांनी घर बांधून दिले आहे. विशेष म्हणजे हे घर स्वखर्चाने बांधून देत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे नाव या घराला देण्यात आले आहे.

सिद्धार्थ नगर येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबात ३ दिव्यांग मुले देखील आहेत. या तिन्ही मुलांना अशाच हलाखीच्या परिस्थितीत वाढविणाऱ्या त्यांच्या आईला कल्लेश मड्डी यांनी घर देण्याचे आश्वासन दिले होते. या घराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते पार पडला होता. आता या घराचे कामकाज पूर्ण झाले असून म्हातपस्वी अथणी श्री मुरुघेन्द्र शिवयोगी शतक महोत्सव यात्रेच्या निमित्ताने या घराचे उद्घाटन करण्यात आले आहे. आपल्या प्रभागाच्या विकासासासाठी सदैव तत्पर असणारे कल्लेश मड्डी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत स्वखर्चाने घर बांधून दिले आहे. शिवाय या घराला लक्ष्मण सवदी यांचे नाव देण्यात आल्याने याबद्दल त्यांचे पुत्र चिदानंद सवदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी युवा नेते सुधीर मड्डी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, लोकनेते लक्ष्मण सवदी यांच्या प्रेरणेतून आपल्या विभागात काम करण्याची इच्छा निर्माण होते. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून जनसेवा करणे हे प्रमुख उद्दिष्ट्य असल्याचे ते म्हणले. अथणी येथील गरीब कुटुंबाला घर बांधून देण्यात शैला मड्डी, सुरेख मड्डी, सिद्दू मड्डी, महांतेश बाडगी, सिद्दू मड्डी, बाबू कांबळे, सिद्धलिंग मड्डी यासह अनेकांचे सहकार्य लाभले आहे. आपल्या प्रभागात शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्याचीही आवश्यकता असून कमीतकमी ४ युनिट लक्ष्मण सवदी यांच्या नावे स्थापन करण्याचा संकल्प केला असल्याची प्रतिक्रिया सुधीर मड्डी यांनी व्यक्त केली. यावेळी भाजप नेते महांतेश ठक्कण्णावर, सिद्धलिंग मड्डी, सिद्दू मड्डी, रवी टंगोळे, रावसाब नडोनी, भालचंद्र घटकांबळे, गुलाब घटकांबळे, संदीप घटकांबळे, दीपक नुली, प्रशांत पट्टण, श्रीनिवास पट्टण, अमर जिरग्याळ, अमित जिरग्याळ, अप्पू घटकांबळे, राकेश पट्टण, मयूर जिरंग्याळ, मुरुगेश पट्टण, विठ्ठल पुजारी, शशिकांत निडोणी, आनंद मड्डी, रवी मड्डी, सागर जिरग्याळ, श्रीधर जिरग्याळ, परशुराम पुजारी, बाबू कांबळे आदी उपस्थित होते.

Tags: