Chikkodi

चिकोडी : रस्ते कामकाजासाठी ८० लाख रुपयांचे अनुदान मंजूर

Share

चिकोडी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या शिफारसीनुसार रस्ते कामकाजासाठी ८० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून कृष्णा कित्तूर सर्कल ते बजनवाड पर्यंतच्या १.५ किलोमीटर पल्ल्याच्या रस्ते कामकाजाला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्याहस्ते चालना देण्यात आली.

शनिवारी कृष्णा कित्तूर सर्कल ते बजनवाड या १.५ किलोमीटर पल्ल्याच्या रस्ते कामकाजासाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या शिफारसीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने एमडीआर योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. या रस्ते कामकाजाची सुरुवात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना दीपक पाटील म्हणाले, अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या विकासासाठी ग्रामस्थांची मागणी पुढे आली होती. सदर मागणी खासदारांच्या कानी घालताच त्यांनी सदर रस्ते कामासाठी ८० लाखांचे अनुदान मंजूर करून या रस्ते कामकाजाला सुरुवात करण्यात आली.यावेळी डॉ. मोहनराव कारची, प्रमोद करबसप्पगोळ, दिलीप पाटील, जिन्नाप्पा शिरट्टी,मोहन गाणीगेर, तम्मण्णा पारशेट्टी, विश्वनाथ पाटील, यमनु पाटील, भीमण्णा चौका, ईश्वर अपराज, भरम भगाटे, दुंडाप्पा तुंगशेट्टी, संभाजी पवार, उदार निडगुंडी आदी उपस्थित होते,

Tags: