अथणी गच्चीनमठाचे श्री मुरुघराजेंद्र शिवयोगी यांच्या शतकपूर्ती पुण्यतिथीनिमित्त सोमवारी सायंकाळी त्यांच्या प्रतिमेची आणि चरित्र ग्रंथाची अथणी येथे मिरवणूक काढण्यात आली.


अथणी शहरातील श्री शिवयोगी चौकातून सुरु झालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. झान्जपथक, ढोलताशा पथक, घोडे मिरवणुकीच्या अग्रभागी होते. भक्तांनी गुलाल उधळत मोठ्या जल्लोषात या मिरवणुकीत भाग घेतला.

शिवयोगी चौक, आंबेडकर चौक आदी प्रमुख चौक आणि मार्गांवरून फिरून विद्यापीठ शाळेच्या आवारात मिरवणुकीची सांगता झाली. तेथे शिवयोगी महस्वामीजींवरील चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

मिरवणुकीत श्री शिवबसव स्वामीजी, मरळसिद्ध स्वामीजी यांच्यासह तालुक्यातील विविध राजकीय नेते, कार्यकर्ते, श्री मठाच्या स्त्री-पुरुष भक्तांनी सहभाग घेतला.


Recent Comments