घटप्रभा शहरातील एसडीटी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सन 2002-03च्या पीयुसीच्या माजी विध्यार्थ्यानी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

धुपदाळ येथील श्री गार्डनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षिका एस. एम. नायकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर चिदंबर देशपांडे, एस. जी. नाईक, जी. हिरेमठ, एम. कमते, डी. बी. करगावी, एम. व्ही. हिरेमठ, आर. बी. जिरली, बी. वाय. पात्रोट आणि बडिगेर तोळी हे शिक्षक उपस्थित होते. यावेळी माजी विध्यार्थी संघाच्या सदस्यांनी आपल्या या गुरुजनांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चिदंबर देशपांडे म्हणाले, आजचे शिक्षण लेव्हल मार्क्सकार्ड पूर्ती मर्यादित राहिले आहे. विध्यार्थी मार्क्स घेण्यापुरते शिक्षण घेत आहेत. यातून देशाचे नुकसान होत आहे. देशाची संस्कृती, परंपरा टिकविणारे शिक्षण देण्याची आज गरज आहे.
माजी विद्यार्थिनी रुपश्री कमते म्हणाल्या, आम्ही आम्हाला घडविलेल्या शिक्षकांची आणि शाळा-कॉलेजची काळजी घेणे गरजेचे आहे. घटप्रभा येथील एसटीडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थी संघातर्फे आम्हाला शिकवलेल्या गुरुजनांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.
यावेळी माजी विध्यार्थ्यानी आपापले अनुभव कथन केले. माजी विध्यार्थी संघाचे राघवेंद्र गुंडवगोळ, गिरीश नाईक, युनूस शेख, अनुराधा बेळवी, सुनीता हेब्बाळकर, रुपश्री कमते आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी एसडीटी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सन 2002-03च्या पीयुसीच्या माजी विध्यार्थी उपस्थित होते. त्यांनी आपल्या विध्यार्थी दशेतील आठवणी जागविल्या.


Recent Comments