चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथे नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला धर्मस्थळ आपत्ती निवारण पथकाच्या स्वयंसेवकांनी वाचविले.

होय, कौटुंबिक कलहाला कंटाळून आत्महत्या करण्यास निघालेल्या एका व्यक्तीचा जीव धर्मस्थळ आपत्ती निवारण पथकाच्या स्वयंसेवकांनी वाचविला. ही घटना चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथे घडली. तानाजी पवार (वय ५४) असे वाचलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मांजरी गावचाच रहिवासी आहे.
घरात झालेल्या भांडणानंतर तानाजी पवार यांनी गावातीलच कृष्णा नदीत जुन्या पुलावरून उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. हे समजताच धर्मस्थळ शौर्य आपत्ती निवारण पथकाचे स्वयंसेवक हनुमंत पायन्नावर, मुत्तप्पा असोदे, राघवेंद्र अम्बुगोळ आणि गावातील युवकांनी नदीत उडी घेऊन तानाजी यांना बाहेर काढून खासगी इस्पितळात दाखल करून त्यांचा जीव वाचविला. एकंदर धर्मस्थळ शौर्य आपत्ती निवारण पथकाच्या स्वयंसेवकांमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले ही कौतुकाची बाब म्हणावी लागेल.


Recent Comments