खानापूर तालुक्यातील लिंगनमठ गावातील श्री मरेम्मा देवी यात्रा महोत्सवाच्या औचित्याने नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा, खानापूर मतदार संघाच्या भाजप महिला मोर्चा प्रभारी, बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आणि क्षत्रिय मराठगा महिला घटकांच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी यात्रोत्सवात सहभाग घेऊन आशीर्वाद घेतले.

या यात्रोत्सवात सहभागी झाल्यानंतर डॉ सोनाली सरनोबत यांनी मरेम्मा देवीच्या मंदिर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.यानंतर कक्केरी ग्राम पंचायत व्याप्तीतील करीकट्टी ग्राम देवता श्री बिश्टादेवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गावातील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. सरकारकडून येणाऱ्या सुविधांसंदर्भात माहिती दिली.
खानापूर तालुक्यातील कारलगा गावातील चव्हाटा मंदिर यात्रोत्सवात देखील त्यांनी सहभाग घेतला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात देखील त्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. सोनाली सरनोबत यांच्याहस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आले. यानंतर ग्रामीण भागातील जनतेला रोजगार हमी योजने अंतर्गत येणाऱ्या सुविधांचीही माहिती दिली.


Recent Comments