Hukkeri

हुक्केरी तालुक्यात एसएसएलसी परीक्षेची तयारी पूर्ण

Share

हुक्केरी तालुक्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या एसएसएलसी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी दिली.

‘आपली मराठी’सोबत बोलताना गट शिक्षणाधिकारी मोहन दंडीन म्हणाले, एसएसएलसी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी हुक्केरी तालुक्यात सर्व तयारी पूर्ण केली आहे. यंदा तालुक्यातून एकूण 6,749 विध्यार्थी परीक्षा देत असून त्यासाठी 26 केंद्रांची स्थापना केली आहे. परीक्षा केंद्रांभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विध्यार्थ्यांना आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय आदी व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व उपाय करण्यात आले आहेत. परीक्षा खोल्यात  बसविण्यात आले आहेत. त्याचे दररोजचे फुटेज डीडीपीआय कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर येण्यासाठी मोफत बस प्रवासाची सुविधा दिली आहे. हॉल तिकीट दाखवून विध्यार्थ्यांना ही सुविधा घेता येईल. विध्यार्थ्यानी निर्भय वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन दंडीन यांनी केले. यावेळी संसाधन अधिकारी एस. बी. नायक, अक्षरदासोह संचालक श्रीशैल हिरेमठ आणि नोडल अधिकारी आर. आर. घस्ती उपस्थित होते.

 

 

Tags: