Chikkodi

एसएसएलसी परीक्षेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा सज्ज

Share

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात यंदा 157 परीक्षा केंद्रांवर एकूण 44,780 विध्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन हंचाटे यांनी दिली.

चिक्कोडी येथील डीडीपीआय कचेरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डीडीपीआय हंचाटे म्हणाले, येत्या 28 मार्चपासून 1 एप्रिल पर्यंत एसएसएलसी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 2,356 वर्गखोल्या निश्चित केल्या आहेत. विध्यार्थ्यानी मुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात असे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. पर्यवेक्षक, परीक्षा कर्मचारी मिळून एकूण 4,507 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षा देण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आवाहन आरोग्य खात्याला करण्यात आले आहे अशी माहिती डीडीपीआय हंचाटे यांनी दिली.

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व एसएसएलसी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षार्थींसाठी मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. एका वर्गात केवळ २० विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करून सामाजिक अंतराचा नियम पाळण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर मुख्य अधीक्षक, पर्यवेक्षक तसेच सहायक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचे डीडीपीआय हंचाटे यांनी यावेळी सांगितले.

 

 

Tags: