ट्रॅक्टर आणि मोटरसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी बैलहोंगलजवळील बायपास रस्त्यावर झाला.

होय, बैलहोंगल शहरात आज मोटरसायकल आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. बैलहोंगलहून सौंदत्तीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर हा अपघात झाला. ट्रॅक्टरने मोटरसायकलला मागून जोराची धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले. श्रीधर अभय सुतगट्टी आणि राजेश्वरी गौडा अशी दोघा जखमींची नावे असून ते बैलहोंगलचे रहिवाशी आहेत. आय एक युवती यात जखमी झाली असून, तिचे नाव समजू शकलेले नाही. अपघात होताच स्थानिकांनी बैलहोंगल पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ऍम्ब्युलन्समधून इस्पितळात उपचारांसाठी पाठवून दिले. बैलहोंगल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments