महिलांनी आपल्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीतही आपली प्रतिभा दाखवावी अशी प्रतिक्रिया बेळगावच्या आश्रय फाउंडेशनच्या प्रमुख नागरत्ना रामगौडा यांनी व्यक्त केली.

हुक्केरी शहरात विजय रवदी फार्महाउस येथे व्ही आर एस सेवा संस्था, भुवनेश्वरी महिला पतसंस्था, स्वर साधना महिला मंडळ, वैष्णवी देवी स्व सहाय्य्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगाव आश्रय फाउंडेशनच्या नागरातना रामगौडा या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात उपस्थितांना उद्देशून बोलताना नागरत्ना रामगौडा म्हणाल्या, महिलांनी दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीतही आपली प्रतिभा दाखवावी, महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धा, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वकील आशा सिंगाडी, शिवलीला रवदि, उषा रवदि, आदी उपस्थित होत्या.
विजय रवदि सेवा संस्थेच्या अध्यक्षा उषा रवदि या बोलताना म्हणाल्या, महिलांनी समाजात आपले स्थान उंचावण्याची गरज आहे. महिला अबला नाही तर सबला आहे हे दर्शविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वर साधना महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री पाटील, गिरीजा गुडसी, कल्पना, श्रीदेवी, जयश्री, विद्या, लीना, सुद्धा आणि विविध महिला संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.


Recent Comments