मयूर नृत्य अकादमीच्यावतीने आणि शहा परिवाराच्या वतीने नृत्य अलंकार श्रेयल अमित शाह यांचा रंगप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती विदुषी हेमा वाघमोडे यांनी दिली.

१३ मार्च रोजी सायंकाळी देवचंद महाविद्यालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २००५ साली स्थापन करण्यात आलेल्या नृत्य अकादमीत भारतनाट्यमचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांचे मानसिक आणि शारीरिक सुदृढीकरण करणे हे या अकादमीचे उद्दिष्ट्य आहे. या माध्यमातून मुलांना रामायण, महाभारत सारख्या पौराणिक विचारांवर आधारित संस्कार आणि संस्कृतीचेही शिक्षण दिले जाते अशी माहिती विदुषी हेमा वाघमोडे यांनी दिली.
रंगप्रवेश हा एका गुरूच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असतो. रंगप्रवेशाच्या निमित्ताने एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील, अण्णासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, कोल्हापूरचे शिवाजी युनिव्हर्सिटीचे संगीत आणि नाट्य विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली निघवेकर, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष किरण शाह, कोल्हापूर विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संस्थापिका त्रिशाला बाहू साहेब शहा आदींसह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती हेमा वाघमोडे यांनी दिली.
यावेळी प्रकाश शहा, प्रिया शहा, अमित शहा, अंजना शहा आदी उपस्थित होते.


Recent Comments