Khanapur

घरगुती वापरासाठीचे ६ सिलेंडर्स बिडी, नंदगड येथे जप्त

Share

 खानापूर तालुक्यातील बिडी आणि नंदगड येथे अन्न निरीक्षकांच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून व्यवसायासाठी वापरण्यात येणारे 6 घरगुती सिलेंडर्स जप्त केले. त्यामुळे खळबळ माजली आहे.

होय, खानापूर तालुक्यातील बिडी आणि नंदगड येथे घरगुती वापरासाठीच सिलेंडर्स व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणण्यात येत असल्याची माहिती अन्न निरीक्षकांना मिळाली होती. त्यावरून त्यांच्या पथकाने ठिकठिकाणी छापे मारले. नंदगड येथील हॉटेल मालक सुरेश कमतगी, बिडी गावातील रमेश पुन्नोजी, शांताराम शेट्टी, राजू देवाडिगा यांच्याकडील घरगुती सिलेंडर्स जप्त करून त्यांच्याविरूद्ध जीवनावश्यक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्न निरीक्षक एम. पी. नदाफ यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

 

 

Tags: