आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हुक्केरी तालुक्यातील महिलांसाठी स्वयंसिद्धा महिला संघटनेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

हुक्केरीतील शंकरलिंग समुदाय भवनात आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सीमा श्रीकांत हातनूरी यांच्या पुढाकाराने हुक्केरी तालुक्यातील महिलांसाठी स्वयंसिद्धा महिला संघटनेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 
याबाबत पत्रकारांना माहिती देताना अरुणा कुलकर्णी यांनी सांगितले की, स्वयंसिद्धा महिला संघटनेतर्फे याआधी आयोजित स्पर्धा-कार्यक्रमांना महिलांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. यंदाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा योजित केल्या असून, त्यात भाग घेऊन महिलांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विजयालक्ष्मी मिर्जी, डॉ. श्वेता मरगुडे, नगराध्यक्ष सीमा हातनूरी आदी उपस्थित होते.


Recent Comments