भीमगड अभयारण्यात बलवान गविरेड्याचे दर्शन झाले आहे. अशोकनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. रमेश पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात या गविरेड्याची छायाचित्रे टिपली आहेत.

होय, खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील भीमगड अभयारण्यात धष्टपुष्ट गविरेड्याचे दर्शन झाले आहे. खानापूर तालुक्यातील अशोकनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. रमेश पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात या गविरेड्याची छायाचित्रे टिपली आहेत. डॉ. पाटील हे आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकासह जंगल भागातील गावातील रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जात असताना अचानक रस्त्यात त्यांना या गविरेड्याचे दर्शन झाले. रस्त्याच्या मधोमध हा गविरेडा आरामात संचार करताना आढळून आला.
त्याबरोबर डॉ. पाटील यांनी वाहन थांबवून आपल्या मोबाईलमध्ये गविरेड्याची छायाचित्रे टिपली. भीमगड वन्य प्रदेशात जंगली प्राण्यांचे दर्शन होणे सामान्य असले तरी, जीव धोक्यात घालून दुर्गम भागातील रहिवाशांना आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना गविरेड्याचे दर्शन झाले हे विशेष.


Recent Comments