Hukkeri

हुक्केरीत पल्स पोलिओ मोहिमेचे उदघाटन

Share

हुक्केरीतील सरकारी इस्पितळात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे नगराध्यक्ष अण्णाप्पा पाटील यांनी रविवारी दीप प्रज्वलनाने उदघाटन केले

होय, राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला हुक्केरीतील सरकारी इस्पितळात नगराध्यक्ष अण्णाप्पा पाटील तसेच उप नगराध्यक्ष आनंद गंध, माजी जिपं सदस्य अनसूया पाटील आणि मुख्य वैद्याधिकारी महांतेश नरसन्नवर यांनी ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजून चालना दिली.   फ्लो

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी उणेश सिदनाळ म्हणाले, हुक्केरी तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांनी गावोगावी जागृती मोहीम राबविली आहे. जनतेनेही सरकारची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट

तालुका आरोग्याधिकारी डॉ. उदय कुडची म्हणाले, हुक्केरी तालुक्यातील 5 वर्षांखालील सुमारे 43 हजार मुलांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी 202 बूथ तालुकाभरात स्थापन करण्यात आले आहेत. या बुथवर अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी मुलांना डोस देणार आहेत. त्याशिवाय बसस्थानक, साखर कारखान्यांच्या आवारात आणि भटक्या जमातींसाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. सर्व पात्र मुलांना लस देऊन लसीकरणाचे संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार केला आहे.

यावेळी विशेष नोडल अधिकारी डॉ. शिवलीला शिरोळ, क्षेत्र आरोग्य शिक्षणाधिकारी महादेवी चकमट्टी, डॉ. विजयालक्ष्मी तंगडगी, डॉ. दीपक अम्बली, एस. एस. अरिबेंची आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

 

Tags: