सरकारी विध्यार्थी वसतिगृह उभारण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली चिक्कोडीत आज विध्यार्थ्यानी भव्य निदर्शने केली.

चिक्कोडीत सरकारी वसतिगृह उभारण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली चिक्कोडीत आज विध्यार्थ्यानी भव्य निदर्शने केली. शहरातील वर्दळीच्या बसवेश्वर चौकात विध्यार्थ्यानी सुमारे एक तास वाहतूक रोखून धरत निदर्शने केली. प्रांताधिकाऱ्यांनी निदर्शनस्थळी येऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी केली. 
यावेळी ‘आपली मराठी’सोबत बोलताना निदर्शक विद्यार्थ्यांची सांगितले की, चिक्कोडी शहरात आसपासच्या अनेक खेड्यातून विध्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी चिक्कोडीत सुसज्ज वसतिगृह नाही. ते उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करूनही काहीच उपयोग झालेला नाही. चिक्कोडीला शैक्षणिक जिल्हा म्हणण्यात आम्हाला संकोच वाटतो. येथे किमान १ हजार खतांचे विध्यार्थी वसतिगृह तातडीने उभारावे अशी मागणी या विध्यार्थ्यानी केली.
विध्यार्थ्यांच्या या मागणीला सरकार कसा प्रतिसाद देते हे पहावे लागेल.


Recent Comments