Khanapur

ऊस काढण्याच्या प्रयत्नात बालक ट्रॅक्टरखाली चिरडून ठार 

Share

उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधील ऊस काढून घेण्याच्या प्रयत्नात बालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. खानापूर तालुक्यातील आमटूर गावात आज ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

होय, चालत्या ट्रॅक्टरमधील ऊस काढून खाण्याचा मोह दुर्दैवाने एका कोवळ्या जिवाच्या अंगलट आला.

उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधील ऊस काढून घेण्याच्या प्रयत्नात तो चाकाखाली आला आणि काही कळायच्या आत तो जागीच चिरडून ठार झाला. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातून ट्रक, ट्रॅक्टर्स, बैलगाड्यांतून उसाची वाहतूक करण्यात येत आहे. अशा उसवाहक वाहनातील ऊस खाण्याच्या मोहापायी मुलांचा जीव जाऊ शकतो हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना सूचना देऊन त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

Tags: