हुक्केरी तालुकयातील बडकुंद्री होळेम्मादेवी यात्रेसाठी लाखो भाविकांनी देवी दर्शनासाठी रीघ लावली आहे.

हिरण्यकेशी नदीकाठी दरवर्षी माघी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. महिनाभर सुरु असलेल्या या यात्रेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील अनेक भक्त मंगळवार आणि शुक्रवारी दर्शनासाठी येतात.
यंत्रित विविध ठिकाणी लहान मुलांचे खेळ देखील आयोजित केले जातात. तसेच अनेक छोटे व्यावसायिक यात्रा ठिकाणी व्यवसाय थाटलेलेही दिसून येतात.
यासंदर्भात आपली मराठीला प्रतिक्रिया देताना ट्रस्ट कमिटी सदस्य तसेच मुख्य पुजारी एच एल पुजेरी म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविड परिस्थितीमुळे सरकारच्या आदेशानुसार यात्रा भरविण्यात आली नाही. परंतु यंदा कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे मोठ्या उत्साहात हि यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान परिसरात भक्तांच्या सोयोसाठी अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी बडकुंद्री होळेम्मादेवी ट्रस्ट कमिटी सदस्य लक्काप्पा पुजेरी, बाबूगौडा पाटील, शिवानंद पुजेरी, रामगौडा पुजेरी, शिवानंद माणगावी, वीरूपाक्षी नंदगावी. एच एल पुजेरी आदी उपस्थित होते.


Recent Comments