चिकोडी तालुक्यातील इंगळी गावात 50 लाख रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात आलेल्या नूतन मराठा समाज भवनाचे उद्घाटन माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार गणेश हुक्केरी आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून चिकोडी तालुक्यातील इंगळी गावात 50 लाख रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात आलेल्या मराठा समाज भवनाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले.
उद्घाटनानंतर माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी बोलताना सांगितले की माझ्या राजकीय आयुष्यात मी कोणताही जाती धर्म भेद केला नाही. सर्व जाती-धर्म माझ्यासाठी समान असून या उद्देशाने आज इंगळी गावात मराठा समाज भवनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. 
यानंतर पिंगळी गावातील ज्ञानदेव जाधव महाराज बोलताना म्हणाले, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी पिंगळी गावासाठी अनेक विकास कामे राबविली आहेत. इंगळी गावात मराठा समाज भवनाची निर्मिती केल्यामुळे आमदार गणेश हुक्केरी आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या बद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे जाधव महाराज म्हणाले.
अण्णासाहेब शिंदे या दांपत्याच्या हस्ते मराठा भवनात होम हवन कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी रामा ऐहोळे, अशोक जोशी, अण्णासाहेब शिंदे, अशोक अडसोळे, संभाजी घोसरवाडे, संजय माने, निलेश धाबडे, बाजीराव पवार, धनाजी घोसरवाडे, शिवाजी जत्राटे, राजू जत्राटे, संजय पवार, शशिकांत धनवडे, अजित पवार, बाबासाब धाबडे, रवी शिरहट्टी, राजू शेट्टी ,अजित चिगरे, अण्णासाहेब पवार, अरुण पाटोळे, आदी उपस्थित होते.


Recent Comments