Chikkodi

येडूरमध्ये कृष्णा नदीत अज्ञात महिलेचा मृतदेह

Share

चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात कृष्णा नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

होय, बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात कृष्णा नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची बॅग आणि चपला नदीच्या काठावर अधून आल्याने तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे. काहीजणांनी सोमवारी रात्री ८ च्या सुमारास या महिलेला नदीच्या काठावर बसल्याचे पाहिले होते असे सांगण्यात आले. अंकली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

 

Tags: