हुक्केरी तालुक्यातील यल्लापूर या गावात ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभाग, साहस संस्था आणि महिला कल्याण संस्थेच्या बानुली समुदाय रेडिओ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण युवकांसाठी कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

संसाधन व्यक्ती, साहस संस्थेचे योजना संयोजक मयूर साबोजी यांनी बोलताना सांगितले कि, ग्रामीण महिलांमध्ये कचरा व्यवस्थापनासंदर्भात जागृती करणे आवश्यक आहे. सुका आणि ओला कचरा वेगवेगळ्या पद्धतीने ठेवून यामाध्यमातून घरातच पाईप कंपोस्ट, आणि मटका कंपोस्टचा माध्यमातून खतात परिवर्तन करणे, प्लास्टिकचा वापर थांबवणे आवश्यक आहे, असे साबोजी म्हणाले. 
यानंतर कृष्ण गुमास्ते बोलताना म्हणाले, प्लॅस्टिकच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका उद्भवतो. याचप्रमाणे त्वचारोग, मुलांमधील वाढ खुंटणे, मेंदू आणि डोळ्यांच्या विकारात वाढ होते. यामुळे प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भात जागृती करून प्रत्येकाने याबद्दल सजग राहणे आवश्यक आहे.
सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाचे प्राध्यापक बुम्मण्णावर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी कर्नाटक पब्लिक स्कुलचे प्राचार्य किरण चौगुला आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आनंद कुड्डन्नवर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत गेले. अक्षय घोरपडे यांनी आभार मानले.


Recent Comments