पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना ६५ विविध वृक्षांच्या लागवडीची आणि संगोपनाची परवानगी असल्याची माहिती वनमंत्री उमेश कत्ती यांनी दिली. याशिवाय हि वृक्षतोड करण्यासाठी सरळ कायदा स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कित्तूर जवळ असलेल्या गिरियाल – चिन्नापुर गावातील अरण्य विभागाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या वृक्षोद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणात चंदनाची लागवड केली जाते. केवळ कर्नाटकातच या वृक्षांची लागवड होऊ शकते. या वृक्षांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ आपल्याला मिळतो. याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यालाही व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी डीसीएफ हर्षभानू यांनी निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण, संगोपनासंदर्भात विचार व्यक्त केले. लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी साऱ्यांनी संघटित होऊन सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मडिवाळ राजयोगीन्द्र स्वामी, निच्चनकी पंचाक्षरी स्वामी यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. आमदार महांतेश दोड्डगौडर, माजी आमदार व्ही एस पाटील, एसीएफ शिवरुद्राप्पा कबाडगी, आरएफओ वानीश्री हेगडे, उपविभाग अरण्यधिकारी संजय मगदूम आदींसह इतर सरकारी अधिकारी, कित्तूर आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments